dr.satish best web design developer for mac

हनिमनाळ ग्रामपंचायत :

डोंगराच्या कुशीत वसलेलं हनिमनाळ हे आमचं गावं. गडहिंग्लज तालुक्यातील छोट पण सुंदर व निसर्गाचं वरदान लाभलेलं आमच गाव. येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो. हे गाव गडहिंग्लज-भैरापुर-निपाणी मार्गावर वसलेले आहे. गावचे वैशिष्टे म्हणजे गावचा पुर्वीचा बांधलेला नगारखाना, स्वंहयभु हनुमान मंदीर, गावचे आकर्षक बांधलेले ग्रामपंचायत कार्यालय, गावाला लाभलेला निसर्ग, पाझर तलाव, गावातील लोकांचे राहणीमान व उच्च शैक्षणीक आहे, अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. गावातील उच्च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे. हनिमनाळ हे गाव गडहिंग्लाज पासुन ८ कि.मी अंतरावर आहे. तसेच गावास येण्या - जाण्यास वाहतुकीच्या मुबलक सुविधा उपलब्ध आहेत. या गावामध्ये विविध धर्माचे लोक एकत्र गुण्याकगोविंदाने राहतात. गावास विविध पुरस्काराने सन्मा्नित करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1957 साली झाली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर आठ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. ग्रामपंचायतीने म.ग्रा.रो.ह.योजनेतून रस्याांच्या दुर्तफा झाडे लावलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीने जंगली 5500 झाडांची लागवड केलेली आहे. ग्रामपंचायती मार्फत संवर्धनासाठी कर्मचारी ठेवणेत आला आहे. गावातील शेतक-यांनी आपल्या शेताच्याा बांधावर सागवान तसेच आंबा, चिकू झाडांची लागवड केलेली आहे. गावास विविध पुरस्कारराने सन्मानित करणेत आले आहे, जसे भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार मा. राष्ट्रपतीच्या हस्ते प्राप्त झालेला आहे.

सरपंच
श्री. राजेंद्र जनार्दन चव्हाण

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. कल्पना सुनिल पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. विनायक विठ्ठल कांबळे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Hanimnal Grampanchayat
A/P -Hanimnal, Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416501

CONTACTS
Phone :

Office :